कृत्रिम बुद्धिमत्तेचा आईन्स्टाईन
आज ताऱ्यांचे आणि तारकाविश्वांचे वर्गीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते आहे. जनुकांमधील DNA च्या घटकक्रमानुसार कुठल्या आकाराची प्रथिने बनतील हे कृत्रिम बुद्धिमत्ता शोधते आहे. जगभरातील हवामानखात्यांच्या उपकरणांकडून, उपग्रहांकडून मिळणाऱ्या प्रचंड माहितीच्या आधारे हवामानाचा अंदाज बांधण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. ड्रोनने, उपग्रहांनी घेतलेल्या हजारो छायाचित्रांच्या आधारे स्थलांतर करणारे पक्षी, प्राणी यांच्या गणनेचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता …